नवी दिल्ली,16 नोव्हेंबर 09
देशातील गुजरात, दिल्ली आणि महाराष्ट्रातील अणू ऊर्जा प्रकल्पांवर दहशतवादी हल्ल्याची शक्यता गुप्तचर विभागाने व्यक्त केली असून त्यानंतर या प्रकल्पांवरील सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्यात आली आहे. महाराष्ट्रात सुमारे 15 ठिकाणी अणू ऊर्जा प्रकल्प असून त्या दृष्टीने येथे सुरक्षा दलाला तत्काळ अलर्ट केले आहे.
अमेरिकेत एफबीआयच्या ताब्यात असलेला दहशतवादी डेव्हीड हेडली याने ही माहिती दिली असून त्यानंतर देशभरात सुरक्षा व्यवस्था वाढविण्यात आली आहे.